बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“युपीएचं पुनर्गठन करा, सोनियांच्या जागी शरद पवार यांना अध्यक्षपदी बसवा”

मुंबई | युपीएचं पुनर्गठन व्हावं आणि युपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्याकडे देण्यात यावं, असं शिवसेनेेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी आपलं मत मांडलं आहे.

महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आहे, तो उत्तम आहे. संपूर्ण देश आमच्याकडे पाहतोय. आम्ही वारंवार आव्हान केलं आहे की युपीएचं पुनर्गठन केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले. यानंतर राऊतांना विचारण्यात आलं की तुम्ही युपीआयचे घटक नाही आहात?, यावर राऊत म्हणाले, आम्ही एनडीएतून बाहेर पडलो आहोत आणि अकाली दलही बाहेर पडलं आहे तर ममता बॅनर्जी आणि युपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत. असे अनेक प्रादेशिक पक्ष आहेत की जे युपीए किंवा एनडीएमध्येही नाहीत. मात्र ते युपीएमध्ये का नाहीत हा संशोधनाचा विषय असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाला मजबूत व्हायचं असेल तर युपीए मजबूत करायला हवं आणि युपीएला मजबूत करायचं असेल तर त्याचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती द्यावं जो सक्रीय असेल आणि विरोधकांमध्ये त्यांच्या नावावर सहमती असेल, यावेळी असं कोण आहे असा सवाल राऊतांना करण्यात आला यावर राऊतांनी, सध्या तरी शरद पवारांचं नाव समोर येत असल्याचं सांगितलं.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांच्या नावाला सहमती द्यायला हवी. कारण शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष केल्यावर युपीए अधिक मजबुत होईल असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकत सुर्यकुमारने रचला इतिहास, पाहा व्हिडीओ

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

फक्त याच नाही, मागच्या सरकारने देखील अन्यायच केला- ज्येष्ठ IPS अधिकारी संजय पांडे

…अन् प्रवाशांनी खचाखच भरलेली रेल्वे जेव्हा उलटी धावायला लागते, पाहा व्हिडिओ

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?- उर्मिला मातोंडकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More