बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवसैनिक रडणारा नाही तर…’; सेनेला रामराम करत भाजपवासी झालेल्या साबणेंवर राऊतांचं टीकास्त्र!

मुंबई | शिवसेनेत नाराज असलेल्या सुभाष साबणे यांना देगलूर बिलोली या जागेसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुभाष साबणेंसह भाजपवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला गेले होते की शिवसेनेच्या नेत्याला फोडण्यासाठी गेले होते?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच शिवसैनिक रडणारा नसतो तर लढणारा असतो, असं म्हणत संजय राऊत यांनी सुभाष साबणेंवरही टीका केली.

सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपकडे स्वत:ची माणस नाहीत. भाजपने आमचा माणूस घेतला तोही रडका. भाजप दुसऱ्याची लोक घेतयं आणि सुज लपवून ठेवायची असा हा प्रकार असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, शिवसेनेतुन भाजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सुभाष साबणे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेत माझं कोणाशीही काही वाकडं नव्हतं. अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातल्या एकाधिकारशाहीला कंटाळुन आपण शिवसेना सोडत असल्याचं सुभाष साबणे म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

ब्रेकिंग | पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची हजेरी

आर्यनला ज्या पार्टीतून उचललं ‘त्या’ पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ!

मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे किंग खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

”घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्ष बोंबलत बसा”

‘आता वेळ आली आहे, मी लखीमपूर खेरी येथे जाणार’; असदुद्दीन औवेसी आक्रमक!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More