बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजपला अटलजींच्या विचारांची गरज’; ‘सामना’तून भाजपवर टीकेचे बाण

मुंबई | महाराष्ट्रात भाजप-शिवसेना सरकार असलं तरी त्यात सर्वच खुश नाहीत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत सत्ता हस्तगत केली, अशी टीका सगळीकडे होत आहे. गुरुवारी रात्री राजभवन येथे एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

या सर्व सत्तानाट्यात शिवसेना फोडल्याचा ज्यांच्यावर आरोप होता ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे आणि फडणवीसांवर सडकून टीका केलीये. अटलजींचे सरकार फक्त ऐका मताने कोसळत असतानाही अटल बिहारी विचलित झाले नाहीत. तोडफोड करुन मिळालेल्या बहुमतास मी चिमट्यानेही शिवणार नाही. पुढे त्यांनी जे सांगितले त्याची नोंद आजच्या भाजप नेत्यांनी घेणं गरजेचं आहे. ते लोकसभेच्या सभागृहात म्हणाले, मंडी सजी हुई थी, माल भी बिकने के लिए तयार था, लेकीन हमने माल खरीदना पसंद नही किया था. अटलजींचा हा वारसा आज संपला आहे, असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला.

हिंदुस्थानसारख्या महान देशाला आणि त्या महान देशाच्या घटनेला नैतिक ऱ्हासाने ग्रासून टाकले आहे. या परिस्थितीत नजीकच्या भविष्यकाळात तरी बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत कारण बाजारात सर्वच रखवालदार विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी टीका त्यांनी केलीये.

सत्ता मिळाली आता पुढे काय? असा प्रश्न विचारत सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा टिका केली. जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचे आणि आपल्याच लोकशाही व व्यक्तीस्वातंत्र्याच्या दिव्याखाली अंधार, अशी सध्याची स्थिती आहे. विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवून या देशात लोकशाही कशी जिवंत रहाणार? शिवसेनेचे आमदार फुटावेत यासाठी कोणत्या महाशक्ती प्रयत्न करीत होत्या हे मुंबईत उतरवलेल्या सैन्याने उघड केल्याचं सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे कळल्यावर मी गादीवर दणादणा उड्या मारल्या”

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘एकनाथ शिंदेजी अभिनंदन, पण…’; शुभेच्छा देत राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

‘मी एकनाथ संभाजी शिंदे, शपथ घेतो की….’; एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More