मुंबई | आज वर्षभर काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. यूपीएचे भविष्य काय?, हा भ्रम कायम असल्याचं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलंय.
राहुल गांधी हे वैयक्तिकरीत्या जोरदार संघर्ष करत असतात. त्यांची मेहनत वाखाणण्यासारखी आहे. पण कुठेतरी काहीतरी कमी आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे, असंही मत संजय राऊत यांनी अग्रलेखातून मांडलं आहे.
सध्या एनडीएत कोणी नाही तसे यूपीएतही कोणीच नाही, पण भाजप पूर्ण बळाने सत्तेवर आहे व त्यांच्याकडे नरेंद्र मोदींसारखे भक्कम नेतृत्व व अमित शहांसारखे राजकीय व्यवस्थापक आहेत. तसे यूपीएत कोणी दिसत नाही, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलंय.
थोडक्यात बातम्या-
ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार; अमोल मिटकरींचा इशारा
…आता महाविकास आघाडीची झोप उडवणार- आशिष शेलार
मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, आल्यावर बोलेन- एकनाथ खडसे
मनसेच्या खळखट्याकनंतर अॅमेझॉनची माघार; सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार
“माझ्या शुभेच्छा फक्त त्यांनाच जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत”