बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपासही सीबीआय आणि ईडीकडून करण्याची गरज”

मुंबई | नागपूर येथील प्रसिद्ध वकील सतीश उके (Satish Uke) यांना ईडीने (ED) ताब्यात घेतलं. उके यांनी फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या बाजूने केस लढवली होती. उके यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.

ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपासही सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

नागपूरचे वकील सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली. त्यांनी काही अपराध केला असेल, गैरव्यवहार केला असेल तर त्याचा तपास महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) करतील. ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा हा गुन्हा नाहीये, अशी टीका संजय राऊतांनी केली.

दरम्यान, उकेंनी बेकायदेशीर कृत्य केलं असेल. पण ते ओढून ताणून मनी लाँड्रिंग केसेसशी जोडून दहशत निर्माण करून तुम्हाला तुरूंगात टाकू, या प्रकारचं कृत्य निषेधार्थ आहे. महाराष्ट्र पोलीसात याबद्दल तक्रार केली पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

भारत-रशियाची वाढती जवळीक; अमेरिकेने भारताना दिला ‘हा’ गंभीर इशारा

मोठी बातमी! मोदी सरकार ‘ही’ पण कंपनी विकण्याच्या तयारीत

मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागलं

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर जारी, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More