बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिलीये पण….- संजय राऊत

मुंबई |  मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोजक्या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा करून मोजके व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली, पण जनतेला हातापायात साखळदंड बांधूनच बाहेर वावरावे लागेल, असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

कोरोनाचा कठीण प्रसंग, शासन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, लॉकडाऊनमधील परिस्थिती तसंच लॉकडाऊन शिथील केल्यानंतर जनतेची जबाबदारी यानर संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून दीर्घ भाष्य केलं आहे.

जनता टाळेबंदीच्या बेड्यांत जखडलेली असताना मुख्यमंत्र्यांनी ‘पुन:श्च हरिओम’चा नारा देऊन जनजीवनात प्राणवायू फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेने बेभान आणि बेबंद होऊन जगू नये. ‘हरिओम’ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत तूर्त तरी ‘पुन:श्च हरिओम’चे स्वागत करूया असं राऊत म्हणाले आहेत.

माणसांना ‘पुन:श्च हरिओम’ करण्याची जी सवलत मिळाली आहे ती सवलत मंदिरांना मिळणार नाही. मंदिरांची टाळेबंदी कायम आहे. सलूनही उघडणार नाहीत. लोकांनी दुकानात किंवा बाजारात जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा. आता लोकांनी सायकली आणायच्या कुठून? व सायकल वापरायची सवय राहिली आहे काय? पण ही एक शिस्त आहे व ती पाळावी लागेल, असंही राऊत यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात 2361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पाहा तुमच्या भागातील कोरोना रुग्णांचा तपशील

कोरोनाचा पुण्याला दिलासा, मात्र मुंबईत आज धक्कादायक आकडा

गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

महत्वाच्या बातम्या-

‘हरिओम’ ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये- संजय राऊत

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले

सगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, अन्यथा शाळांवर कारवाई करणार- शिक्षणमंत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More