बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ”

मुंबई | केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर घटला असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यातच आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजेच आयएफएमने केंद्राला गाजर दाखवला असल्याची टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे. महागाई ही केवळ कागदोपत्रीच कमी झाल्याचा घणाघात संजय राऊत यांनी अग्रलेखातून केला आहे.

सरकारच्या नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये घाऊक महागाईचा दर हा 5.3 टक्के होता. जो सप्टेंबर महिन्यात 4.45 टक्क्यांवर आला आहे. पण केंद्र सरकार पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी करत नेहमीचा खेळ खेळत आहे, अशी टीका केंद्र सरकारवर आजच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न किंवा रोजगार निर्मितीचा आकडा असो सर्व बाबतीमध्ये केंद्र सरकारची फक्त आकड्यांची जुमलेबाजी सुरू असल्याचा आरोपही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. तसेच एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने केलेला महागाई कमी झालेला दावा फक्त कागदोपत्री असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

जर महागाई खरंच कमी झाली असेल तर मग दरवाढ आणि बाजारात जी महागाई दिसते ते नेमकं काय आहे? असा प्रश्न विचारत कागदावर कमी झालेल्या महागाईची गाजरं केंद्र सरकार खुशीने खात आहे, असा घणाघातही अग्रलेखातून केंद्र सरकारवर केला आहे.

थोडक्यात बातम्या

पाकिस्तानची आर्थिक स्थिती दयनीय, इतर देशांनी कर्ज नाकारल्याने निघणार दिवाळं

ऑनलाइन मद्य खरेदी करणं महिलेला पडलं महागात, बसला लाखोंचा गंडा

आर्यन खानची कोठडी आज तरी संपणार का? जामीन अर्जावर आज परत सुनावणी

तेजस ठाकरे यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला राजकारणात प्रवेश करणार?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More