मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर 5 जून रोजी आयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं जाहीर केलं.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे 10 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची मोठी घोषणा संजय राऊतांनी केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची पूर्ण तयारी झाली आहे. आदित्य ठाकरेंसोबत मुंबई महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील हिंदू अयोध्येत दाखल होतील. अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील हिंदूंनी आम्हाला अयोध्या भेटीचं निमंत्रण दिलं आहे. अस्सल हिंदुत्वाचं त्यांना स्वागत करायचं आहे, असा टोला देखील राऊतांनी लगावला.
दरम्यान, राज ठाकरेंच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून कोणी विरोध करत असेल तर का करत आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला त्याचं काही पडलं नाही. आमचं आयोध्येत जाणं काही राजकीय जाणं नाही. श्रद्धा आणि भक्तीभावापोटी आम्ही जात आहोत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं”
“सहकाऱ्यांना मागे सोडून पुढे पळणारा मुख्यमंत्री नसावा”
काळजी घ्या! संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये आढळतात कोरोनाची ‘ही’ लक्षणं
अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी, म्हणाले…
राष्ट्रवादीचे आमदार उदयनराजेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Comments are closed.