मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या राज्यात खळबळ माजली आहे. संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. या कारवाईमुळे संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे.
संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. संपत्ती जप्त झाल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. हे ट्विट सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
‘असत्यमेव जयते’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता या कारवाई प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे.
असत्यमेव जयते!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 5, 2022
थोडक्यात बातम्या –
Breaking| ईडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; भाजप आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ
राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसे कार्यकर्ते नाराज?, म्हणाले…
“तुम्ही भाजी जरी खरेदी केली तरी भाजप लगेच ईडीला कळवेल”
बुचामध्ये शेकडो मृतदेहांचा खच; ह्रदय पिळवटून टाकणारं दृश्य बघून झेलेन्स्की सुन्न
Comments are closed.