बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ…’; राऊतांचं सूचक ट्विट

मुंबई | भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली अशी बातमी शनिवारी माध्यमांमध्ये पसरली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचंही समोर आलं होतं. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है।, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तसेच माध्यमाशी बोलताना काही लोक आपल्या नावाने अफवा पसरवत असल्याचं म्हटलं आहे. राऊतांनी शेलार यांच्यासोबत झालेल्या भेटीचं वृत्त नाकारलं आहे. मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. अशा अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने सुरू आहेत. ते दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी आशिष शेलारांना एका कार्यक्रमात भेटलो होतो. वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांना भेटतो, राजकारण म्हणजे हिंदूस्तान आणि पाकिस्तान नाही. त्यामुळे राजकारणात भेटीगाठी होत असतात, असं संजय राऊत म्हणाले.

विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिलं पाहिजे. गोंधळ करणं म्हणजे रणनीती नाही. माझ्या बोलण्यानं, लिहिण्यानं त्रास झाला म्हणून अफवा पसरवल्या जातात. जनतेचे विषय मांडा, सभागृहात चर्चा करा. जेवढ्या अफवा पसरवाल तेवढं आम्ही मजबूत होऊ, माझ्यामुळे अडचणी निर्माण होणारे अशा अफवा पसरवत आहेत, असा टोला संजय राऊतांनी विरोधकांना लगावलाय.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

इन्स्टा रिच लिस्टमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राचं नाव!

नवरदेवासाठी त्याचे मित्रच ठरले लग्नातील विघ्न; रिकाम्या हाती परतला नवरदेव

अबब..! विराट कोहलीच्या एका इन्स्टाग्राम पोस्टला मिळते एवढी मोठी रक्कम

मी कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही- संजय राऊत

‘गोपीचंद पडळकरांचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं’; ‘या’ नेत्याची जीभ घसरली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More