बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एखाद्या वावटळीत पोलीस दलाची…’; परमबीर सिंग यांच्या बदलीवर संजय राऊतांचं ट्विट

मुंबई | राज्यभर चर्चेत असलेल्या मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली आहे. या अटकेनंतर पोलीस दलाच्या प्रतिमेवर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली असून हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळालं आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान आणि शान यापुढील काळात अधिक हिमतीने आणि सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

सचिन वाझे यांना अटक झाल्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची यांच्यावर टीका केली जात होती. मात्र आज राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त उचलबांगडी केली आहे. त्यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश शेठ यांच्यकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाली असून हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त असणार आहेत. त्यासोबतच संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! मुलाला घेऊन घरी जात होती महिला अन् अचानक कारवर येऊन कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ

गृहमंत्र्यांची खुर्ची सेफ, मुंबईच्या पोलीस आयुक्तांची मात्र उचलबांगडी

कोरोना लसीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

धक्कादायक! पोटच्या मुलाने जन्मदात्या आईवर उचलला हात, सहन न झाल्याने माऊलीने सोडला प्राण, पाहा व्हिडीओ

‘सिंघम’ मधील काजल अग्रवालचं हॉट फोटोशूट, पाहा तिचे अदाकारी फोटोझ!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More