मुंबई | सीरमची लस मुंबईत आली असून कलियुगातील संजीवनी आज मुंबईत आली आहे. यामुळं कोरोनाचा खात्मा होणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
किशोरी पेडणेकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. तसंच या संदर्भातील माहिती देत मुंबई महापालिकेतील अधिकारी सुरेश काकाणी यांचं किशोरी पेडणेकरांनी विशेष कौतुक केलं.
महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत.
दरम्यान, 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
…यावरून शेतकरी कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले हे स्पष्ट होतं- हेमा मालिनी
“मुस्लिम चार विवाह करतात, धनंजय मुंडेंनी दोन केले तर काय बिघडलं?”
ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जावयाला एनसीबीकडून समन्स
गुजरातच्या मंदिरांमध्ये भाविकांना ‘साष्टांग नमस्कार’ घालण्याची परवानगी नाही तर…
कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं मोठं वक्तव्य म्हणाले…