बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुख्यमंत्र्यांचं आता त्यांचे युवराजही ऐकत नाहीत का?’; व्हिडिओ शेअर करत मनसे नेत्याची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई | मनसे नेते संतोष धुरी यांनी एक लाईव्ह व्हिडीओ शेअर करत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा क्षेत्रातील वास्तव मांडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाच्याच विधानसभा क्षेत्रात मध्यरात्रीपर्यंत पब सुरू आहेत आणि तिकडे कोणत्याही प्रकारचे कोरोनाविषयक ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. वरळीच्या कमला मिल कंपाऊंड परिसरात असलेल्या पब मध्ये जाऊन मनसेच्या संतोष धुरी यांनी स्वतः लाईव्ह करून पोलखोल केली आहे.

कोरोना काय फक्त गरीब आणि सर्वसामान्यांना होतो आणि श्रीमंतांना होत नाही का? असा प्रश्नही त्यांनी या माध्यमातून विचारला आहे. तसेच नियम फक्त सर्वसामान्य जनतेला आहेत आणि पब मध्ये पार्टी करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचे नियम नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकार श्रीमंत गरीब असा भेदभाव करत असून दोघांना वेगवेगळा न्याय देत आहेत.

मुख्यमंत्री लाईव्ह येऊन फक्त सर्वसामान्य जनतेला नियम सांगतात आणि त्यांच्या युवराजांच्या मतदारसंघात मात्र सगळे नियम धाब्यावर बसवले जातात म्हणजे याचा अर्थ युवराज त्यांचं ऐकत नाहीत का? असा प्रश्न धुरी यांनी उपस्थित केला आहे.

वरळीमध्ये जोरदार नाईटलाईफ सुरू आहे आणि पार्टी मध्ये एकाही व्यक्तीने मास्क परिधान न केल्याचं त्यांच्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसून येत आहे. संबंधित प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून त्यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे अस्त्र सोडले आहे.

पाहा व्हिडीओ- 

 

थोडक्यात बातम्या- 

“…तर अशा वादळांची सरकारला आता सवय झालीये”

…अन् ‘या’ पत्रकाराने शेतकरी आंदोलनातच 12 लाखाच्या नोकरीचा दिला राजीनामा!

“आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी घेऊ नका”

‘हिंमत असेल तर…’; अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज

‘बिग बी’ यांच्या प्रकृतीत बिघाड स्वत: पोस्ट करत दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More