अभिमानास्पद! काश्मीर खोऱ्यात जिल्हाधिकारीपदी मराठामोळे संतोष सुखदेवे
मुंबई | महाराष्ट्रातील मेळघाटच्या आदिवासी पाड्यातील संतोष सुखदेवे यांनी कारगिलच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी म्हणजे जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारल्यानंतर सार्वजनिक सेवा आणि टीमवर्क हेच माझ्या कामाचं घोषवाक्य असल्याचं संतोष सुखदेवे यांनी म्हटलं आहे.
सुखदेवे यांनी कागरगिलचे सध्याचे जिल्हाधिकारी उस हक चौधरी यांच्याकडून हा पदभार स्विकारला. त्यानंतर संतोष सुखदेवे यांच्यावर महाराष्ट्रातून आणि देशभरातील त्यांच्या मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आदिवासी भागातील तरुण कारगिलसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उच्चपदी जाणं हा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सुखदेवे यांचं अभिनंदन केलं आहे.
मेळघाटसारख्या आदिवासी भागातील तरुण कारगिलसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उच्चपदी जाणं अभिमानास्पद आहे. सुखदेवे यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!, असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.
मेळघाटमधील (ता. धारणी) नारवाटी या आदिवासी पाड्यातील संतोष सुखदेवे हे कारगिलमध्ये कलेक्टर म्हणून रुजू झाले. मेळघाटसारख्या आदिवासी भागातील तरुण कारगिलसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उच्चपदी जाणं अभिमानास्पद आहे. सुखदेवे यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/kkcjzrkgbn
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 25, 2021
थोडक्यात बातम्या-
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूंचा काँग्रेसला रामराम; ‘या’ पक्षात केला प्रवेश
मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने मुंबईत हायअलर्ट
छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण प्रकरणावर गप्प का?- देवेंद्र फडणवीस
“मोदी हे महान आहेतच त्याविषयी शंका घेण्याचं कारण नाही, पण…”
नाना पटोलेंचा राष्ट्रवादी, शिवसेनेला इशारा, म्हणाले…
Comments are closed.