मनोरंजन

सारा अली खानशी चुंबन घेण्याचा चाहत्याचा प्रयत्न; व्हीडिओ तुफान व्हायरल

मुंबई | केदारनाथ या चित्रपटातून अभिनेत्री सारा अली खान हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पन केलं होतं. सारा सध्या तिच्या अभिनयासोबतच तिच्या अफेअर्समुळे चांगलीच चर्चेत असते. अशातच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये एक चाहता साराच्या हाताचा चुंबन घेण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सारा जिममधून बाहेर आली तेव्हा चाहते तिच्या भोवती जमा झाले. त्यांच्यातील एकाने साराशी गैरवर्तन केले आहे.

काही लोकांनी साराला फोटो काढण्यासाठी विनंती केली. यावेळी साराने विनंतीला मान देत चाहत्यांसोबत फोटो काढला. फोटो काढत असताना एका चाहत्याने अचानक साराचा हात पकडला आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी साराच्या अंगरक्षकाने त्या चाहत्याला हाकलून लावले.

दरम्यान, सारा लवकरच वरुन धवनसोबत ‘कूली नंबर वन’ या चित्रपटाच दिसणार आहे. हा चित्रपट 90 च्या दशकात प्रदर्शित झाला होता.

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘छपाक’ चित्रपटाच्या यशासाठी दीपिका पादुकोण बाप्पाच्या चरणी

‘साहित्य संमेलनाला जाऊ नका’; ना. धो. महानोरांना ब्राम्हण महासंघाची धमकी?

‘छपाक’ चित्रपटावर बहिष्कार टाकणे दुर्दैवी; अमोल कोल्हेंनी केली दीपिकाची पाठराखण

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या