सरपंचपद वाटून घेणारांची गोची, ५ वर्षे एकच सरपंच राहणार!

मुंबई | राज्य सरकारने सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे राज्यातील गावांना यापुढे ५ वर्षे एकच सरपंच मिळणार आहे.

याआधी पॅनल उभे केले जायचे त्यामुळे सरपंच पदासाठी ओढताण व्हायची. त्यातून पर्याय म्हणून सरपंच पद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याची शक्कल काही जणांनी लढवली. मोठी उलाढाल असलेल्या गावांमध्ये तर वर्षाला सरपंच बदलला जाई.

दरम्यान, नव्या नियमानूसार थेट गावकरीच सरपंचाची निवड करणार आहेत. त्यामुळे सलग ५ वर्षे गावाला एकच सरपंच मिळू शकेल.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

  1. 5saal ekhi sarpanch teek hai agar vo Beiman hogaya to use kabhi bi gaddi utarneka bhi provdhan hona chahiye

Comments are closed.