मुंबई | शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यानंतर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेनेनं सामनामधून प्रत्युत्तर दिलंय.
सरसंघचालक आणि शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला व राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच होती. हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर टीका केलीये.
अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनास सरसंघचालक मोहन भागवत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. राममंदिर व्हावं ही संघाची भूमिका होती. मात्र कोरोनाच्या परिस्थितीची पर्वा न करता सर्व मंदिरं खुली करा, असं भागवत कधीच सांगणार नाहीत, असंही सामनातून म्हटलं आहे.
घंटा बडवून, थाळ्या वाजवून कोरोना पळून जाणार नाही. भारतीय जनता पक्षाचे जे लोक मंदिरासाठी थाळ्या बडवत आहेत व छाती पिटत आहेत त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत, असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आलाय.
महत्त्वाच्या बातम्या
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ कारणामुळे रोहित शर्माला वगळलं!
तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!
चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा
उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही – कंगणा राणावत
“महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे मुख्यमंत्र्यांना कळणारही नाही”