MPSC परीक्षेत ‘व्यापम’सारखा घोटाळा; काँग्रेसचा सनसनाटी आरोप

MPSC परीक्षेत ‘व्यापम’सारखा घोटाळा; काँग्रेसचा सनसनाटी आरोप

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) ‘व्यापम’सारखा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला आहे.

एमपीएससी परीक्षेत मोबाईल क्रमांकाच्या शेवटच्या डिजिटवरुन आसन क्रमांक दिला जातो. विद्यार्थ्यांनी हा क्रमांक मित्राच्या क्रमांकाशी मिळताजूळता करुन एकत्र आसन क्रमांक मिळवला, त्यामुळे सामुहिक काॅपीचा प्रकार घडला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एमपीएससी परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी, तसे न झाल्याचं न्यायालयात जाणार असल्याचं तांबे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या घोटाळ्यामुळे प्रामाणिक अभ्यास करणारे तसेच गरीब विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतं असल्याचं, त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

प्रियांका गांधीच्या रोड शोदरम्यान मोबाईल चोरीला, काँग्रेस कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन

-युतीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर ठेवल्या ‘या’ चार अटी

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा संशयास्पद मृत्यू

-संजय काकडे आणि अजित पवार यांच्या भेटीने चर्चांना उधान

विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी?

Google+ Linkedin