जीन्सवाल्या मुलीसोबत कोण लग्न करणार? मोदींच्या मंत्र्याचा सवाल!

गोरखपूर | मोदी सरकारचे मंत्री सत्यपाल सिंह यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. जीन्स घालणाऱ्या मुलीसोबत कोण लग्न करणार?, असं त्यांनी म्हटलंय. 

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंचावर उपस्थित होते. 

कोणी जीन्स घालून एखाद्या मंदिराचा महंत बनला तर लोक त्याचा स्वीकार करतील का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना विचारला.