SBI च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; बँकेने घेतला महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली | हल्ली ऑनलाईन बँकिंगचं प्रमाण प्रंचड प्रमाणात वाढलं आहे. जो तो ऑनलाइन पैसे आणि व्यवहार करत आहे. हे व्यवहार करण्यासाठी प्रत्येकाला अँप किंवा त्या बँकेचं अँप घ्यावं लागायचं. तसेच पासबूक प्रिंट, अकाऊंट चेक करण्याठी रांगेत उभं रहावं लागायचं. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागायचा. मात्र जर तुम्ही एसबीआय (SBI) बँकेचे ग्राहक असाल तर हे सगळे अपडेटस तुम्हाला घर बसल्या मिळणार आहेत.
भारतातील (India) मोठी बँक एसबीआयने एक भन्नाट आणि ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. हल्ली व्हाॅट्पअॅप हे मॅसेजिंग अँप वापरलं जातं. अनेक कामं यामुळे सोपी होतात. आता त्यामुळेच एसबीआयने व्हाॅट्पअॅप बँकीगची सुरूवात केली आहे.
व्हाॅट्पअॅप (whatsapp) बँकीगसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. यासाठी बँकेत असणाऱ्या नंबरवरूनच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला WAREG टाईप करायचा आहे. स्पेस द्यायचा आहे. स्पेस देऊन तुमचा अकाउंट नंबर लिहायचा आहे. त्यांनतर 7208933148 यावर मॅसेज पाठवायचा आहे. WEREG <Space>Account Number अशा फाॅर्मटमध्ये 7208933148 या नंबरवर पाठवायचा आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 9022690226 या नंबरवरुन तुम्हाला मॅसेज येईल. त्यावरून तुम्ही संवाद साधू शकता.
सध्यातरी यावरून तुम्ही खात्याचा हिशोब, लहान स्टेटमेंट चेक करू शकता. ही सुविधा 24 तासासाठी (24 hours) उपलब्ध असणार आहे. यामुळे आता ग्राहकांना घरबसल्या माहिती मिळणार आहेत.
थोडक्यात बातम्या
“लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कशी होणार”
शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंवर आरोप करत ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा
इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू
चिमकुलीचा थेट मुख्यमंत्र्यांकडे हट्ट, म्हणाली ‘मला पण गुवाहाटीला फिरायला न्या’, पाहा व्हिडीओ
मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर
Comments are closed.