बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विद्यार्थ्यांनो लागा तयारीला; SBI मध्ये पदभरतीची घोषणा

मुंबई | सध्या देशात विविध विभागांमधील पदांची भरती प्रक्रिया चालू आहे. अशात प्रदिर्घ काळापासून विद्यार्थी एसबीआय क्लर्क आणि एसबीआय (SBI )पीओ पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

एसबीआयच्या ट्रेंडनूसार भरती प्रक्रिया एप्रिल महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तर प्राथमिक परीक्षा ही जून-जुलैदरम्यान आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. एसबीआय लिपीक परीक्षेत दोन परीक्षा असतात. एक प्रिलीम्स आणि नंतर मुख्य परीक्षा असते. मुलाखतीची प्रक्रिया एसबीआय लिपीक पदासाठी नसते.

100 गुणांसाठी 100 प्रश्न असतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना 60 मिनिटे वेळ मिळतो. पास झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेत चार पेपर सोडवावे लागतात. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पास किंवा शेवटच्या सेमिस्टरला असणारे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात.

दरम्यान, एसबीआय परीक्षेस पात्र उमेदवारांचं वय हे 20-28 वर्षांच्या मध्ये असावं लागतं. या परीक्षेची तयारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं करतात.

थोडक्यात बातम्या – 

पाकिस्तानात राजकीय उलथापालथ सुरूच; इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता

“भाजपचा प्रमुख नेताच केंद्रीय तपास यंत्रणेसोबत राज्यात खेळ करतोय”

“राजीनामा देतो पण अटक करु नका”

Pakistan Political Crisis | इम्रान खानचं सरकार पडलं, पंतप्रधान पदावरून अखेर हकालपट्टी

मुंबईचा सलग चौथा पराभव; रोहितचा ‘हा’ हुकमी एक्का ठरतोय फेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More