मुंबई | ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन अनूसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट करत महिती दिली आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. सन 2021-2022 मध्ये डिजिटल पद्धतीनं शिक्षण घेत आहेत, त्यांची उपस्थिती ग्राह्य धरुन यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देश समाजकल्याण आयुक्तांना दिले असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.
2021-2022 मध्ये विद्यार्थ्यांना 75% उपस्थितीचा आवश्यक टप्पा गाठणे शक्य होणार नाही, यामुळे हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यााबाबत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची प्रतही मुंडेंनी आपल्या ट्विटमधून शेअर केली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहेत व सन २०२०-२१ मध्ये डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत, त्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत. (1/2) pic.twitter.com/Unt7m8pkTd
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 3, 2021

थोडक्यात बातम्या-
“मोदी सरकारने हे बजेट सामान्यांसाठी नाही तर उद्योगपतींसाठी आणलं”
…तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाही- निलेश राणे
मुंबईसह राज्यातील महिलांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी घोषणा!
पुण्यातील ‘या’ तरुणीने तब्बल 16 तरुणांना अडकवलं आपल्या जाळ्यात; 15 लाखांहून अधिक किंमतीचा लुटला ऐवज
‘भाजपनं आधीच सुधीर मुनगंटीवारांकडं जबाबदारी दिली असती तर…”