Top News कोरोना मुंबई शिक्षण

मुंबईतील शाळा आणि कॉलेज ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद, महापालिकेचा निर्णय

मुंबई | मुंबई महापालिकेने शाळकरी विद्यार्थ्यांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. मुंबईतील सर्व शाळा तसंच कॉलेज बंद ठेवण्याच्या दिवसांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

शाळा आणि कॉलेजं 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र यामध्ये आता वाढ करून 15 जानेवारीनंतर शाळा आणि कॉलेजं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असली तरी अन्य देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता खबरदारी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा तसंच कॉलेजं बंद ठेवण्यात येणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

भारत-ब्रिटन विमान प्रवासावरील बंदीत वाढ होणार; उड्डाणमंत्र्यांचे संकेत

हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा; भाजप आमदाराची टीका

10 वर्षांपासून स्वतःला खोलीत बंद ठेवलं; उच्चशिक्षित 3 भावंडांची कहाणी

मोठी बातमी! रजनीकांत राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत

भाजपला मोठा धक्का, ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या