बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येणार, वैज्ञानिकांनी विकसित केले नवे उपचार!

नवी दिल्ली | जगभर पसरत असलेल्या कोरोनावर अनेक देशात लसीकरणाचा टप्पा चालू झालेला आहे. तरी सुद्धा अनेक राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र अमिरेकेच्या जाॅर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी आणि एमोरी विद्दापिठाच्या  वैज्ञानिकांनी कोरोना नष्ट करण्यासाठी उपचार काढला असल्याचं समोर आलं आहे.

अमेरिकाच्या तज्ञांनी शोधलेल्या उपचारामुळे कोरोना व्हायरस आणि फ्लू सारखे आजारांपासून संरक्षण होऊ शकतं. यावर दिलेल्या महितीनुसार या उपचाराचा वापर आपण घरुन सुद्धा करु शकतो. नॅचरल बॉायोटेक्नाॅलाॅजी या जनरलमध्ये सविस्तरपणे स्पष्ट केल्यानुसार हा नवीन उपचार सीआरआयएसीपीआर तंत्रावर आधारित आहे. फिलीप सेंटाजेलो यांनी केलेल्या वक्तव्यानुसार आरएनएचा एकच क्रम बदलावा लागणार असून औषधामध्ये तुम्हाला केवळ एका विषाणुपासून दुसऱ्या विषाणुमध्ये बदल करावा लागेल.

कोरोना आजारचं कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसचा फ्लूद्वारे शोध लावल जात असल्याचं संशोधकांच्या पथकाचे सदस्य फिलीप सेंटाजेलो यांनी सांगितलं आहे. मात्र याचा प्रयोग पुर्णपणे निरोगी असलेल्या जनावरांवर केला जाईल, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे.

दरम्यान, लसीकरण करण्याआधी लसीचा प्रभाव वाढवण्यासाठी तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार दररोज प्रमाणे लसीकरणादिवशी दिवसाची सुरवात करावी. निरोगी आणि संतुलित आहार घेऊन स्वतःला हायड्रयेट ठेवण्यासाठी पुरेसे पणी प्यावे. तसेच डोसच्या 2 किंवा 3 दिवसाआधी पासून व्यायाम करावा ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यावर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांचं मोठं वक्तव्य!

…अन् भरबैठकीत नाना पटोले संतापले; ‘या’ मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीवर व्यक्त केली नाराजी

सख्खे भाऊ पक्के वैरी; आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून सभागृहात राडा; फडणवीसांनी केले गंभीर आरोप

कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More