बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

6 दिवसात कोरोना रुग्णाचं बिल 1.83 लाख, 1.18 लाख भरुनही स्कूटी केली जप्त

जयपूर | कोरोना महामारीच्या काळात जिथे लोक जीवन-मृत्यूशी झुंज देत आहेत, तेथे काही खासगी रुग्णालय चालक या आपत्तीत आपली चांदी करत आहेत. रूग्णालयात दाखल रूग्णांकडून उपचाराच्या नावाखाली हजारो लाखो रुपये घेतले जात आहेत आणि त्यांचे खिशे भरत आहेत. पैसे न दिल्यास, रुग्णाला एकतर गंभीर स्थितीत सोडण्यात येत आहे किंवा त्याचे वाहन किंवा इतर वस्तू जप्त केली जात आहे.

अशीच एक घटना जयपूरच्या सीतापुरा जवळील महावीर कॉलनी इंडिया गेट येथे भानु रुग्णालयात उघडकीस आली आहे. जेथे एका युवकाची स्कूटर रुग्णालय चालकाने आपल्या ताब्यात घेतली आणि 50 हजार देऊन ती गाडी भेटेल, असं सांगण्यात आलं. पीडित तरूण हेमंत रावत निवासी प्रताप नगर यांनी सांगितले की, त्यांचे वडील मोहनसिंग यांना 7 मे रोजी भानु रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून आयसीयूमध्ये शिफ्ट होण्यास सांगितले आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्यास सांगितले.

आयसीयू शुल्क दररोज 6 हजार रुपये आणि डॉक्टरांची फी एक दिवसासाठी 1 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती, तर औषधे आणि चाचण्यांसाठी स्वतंत्र शुल्क देण्याचे सांगण्यात आले. 6 दिवस ठेवल्यानंतर रुग्णालयाच्या ऑपरेटरने रुग्णाला दुसर्‍या रुग्णालयात घेऊन जायला सांगितलं आणि 65 हजार जमा करण्यास सांगितलं. पैसे न दिल्यास तुमची गाडी जप्त करण्यात येईल, असं देखील सांगण्यात आलं.

दरम्यान, पिडीत तरुण हेमंत रावत यांनी सांगितलं की, 12 तारखेनंतर डिस्चार्ज भेटल्यानंतर ते त्यांच्या वडिलांना झोटवाडा मधील मरुधर हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्या हाॅस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतर तिथल्या डाॅक्टरांनी देखील आयसीयू मध्ये ठेवण्याचे एका दिवसाचे 50 हजार लागतील असं सांगण्यात आलं, असं पिडीत तरुणाने सांगितलं.

थोडक्यात बातम्या –  

वयाच्या 92व्या वर्षी ‘या’ ज्येष्ठ शेतकरी नेत्याने केली कोरोनावर मात

कोरोना उपचारात आता प्लाझ्मा थेरपी नाही; ICMR आणि AIIMSचा मोठा निर्णय

आता तुम्हाला नेटवर्क प्रॅाब्लेम येणार नाही, जिओनं उचललं सर्वात मोठं पाऊल!

लॉकडाऊनमध्ये घरातच पोल डान्स करायला गेली महिला अन्…; पाहा हास्यास्पद व्हिडिओ

आता 15 मिनिटात कोरोना रिपोर्ट; ‘या’ कंपनीनं तयार केली 100 रूपयांची कोरोना चाचणी किट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More