बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोका वाढला! महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस आजाराचा दुसरा बळी, तर इतक्या रूग्णांवर उपचार चालू

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवला असतानाच आता नव्या एका आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचे काही रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. मात्र अशातच म्युकरमायकोसिसमुळे दोघांचा मृत्यु झाल्याची माहिती समजत आहेत.

कल्याण डोंबिवलीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीत राहणारे बाजीराव काटकर आणि कल्याण ग्रामीण येथील महारण परिसरात राहणारे तुकाराम भोईर यांचा समावेश आहे. या दोघांचा उपचार डोंबिवलीतील एम्स या खाजगी रुग्णालयात सुरु होते. याच रूग्णालयात आणखीसहा रुग्णांवर म्युकरमायकोसीसचे उपचार सुरु असल्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभागाच्या अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली.

डोंबिवलीमध्ये आज 69 वर्षीय बाजीराव काटकर यांचा म्युकरमायकोसिस या दुर्मिळ आजाराने मृत्यू झाल्याची माहिती त्यांचा मुलगा वैभव काटकर यांनी दिली आहे. म्युकरमायकोसिस इतका भयानक आजार आहे की त्यामुळे रूग्णांना अंधत्त्व आणि इतर गंभीर व्याधी उद्धवू शकतात. राज्यातील काही भागात कोरोना रुग्ण म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराबाबत जनजागृती मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकर मायकॉसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं होतं.

दरम्यान, नाकबंद होणं,  नाकातून काळा किंवा रक्तयुक्त द्रव येणं, गालाचं हाड दुखणे चेहऱ्याच्या एका बाजूने दुखणं, सूज येणं, दात दुखणे, दात हलणे किंवा पडणे, जबडा दुखणे, अंधुक दिसणे या आजाराची लक्षणे आहेत.

थोडक्यात बातम्या- 

संतापजनक! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला शेतात नेत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

“कोरोनावर आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी मला जामीन देण्यात यावा”

‘देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर…’; उद्धव ठाकरेंचा पलटवार

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली! राज्यपालांना निवेदन, लवकरच पंतप्रधानांना भेटणार- मुख्यमंत्री

झोपेत असताना काळाचा घाला! झोपेतच नवरा-बायकोचा होरपळून दुर्दैवी मृृत्यु

…तेव्हा आमचाही जीव तुटतच असेल ना!; डॅाक्टरच्या पत्नीचं काळजाला हात घालणारं पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More