मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असताना आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना स्पष्ट केलं.
4 तारखेपर्यंत जर मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरेंनी औरंगाबाद सभेत दिला. यानंतर राज ठाकरे आज ट्विट करत त्यांची भूमिका स्पष्ट करणार असून राज ठाकरेंच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सकाळी वाजता राज ठाकरे महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांच्या निवासस्थानी बैठक घेणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे त्यांची भूमिका स्पष्ट करतील. राज ठाकरेंच्या घराबाहेर इतरवेळी ठराविक पोलिस असतात. मात्र, आज त्यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला उत आला आहे. त्यामुळे मशिदींवरील भोंग्यांबद्दल राज ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
‘मग ते भोंगेही उतरवा तरच तुम्ही हिमतीचे’, शिवसेनेचं भाजपला खुलं आव्हान
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या राज्यांना महत्त्वाच्या सूचना, म्हणाले…
‘धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही’; अजित पवारांचा हल्लाबोल
राणा दाम्पत्यांना पुन्हा न्यायालयाचा झटका, ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
Comments are closed.