Top News नागपूर महाराष्ट्र

लॉजवर पाॅर्न पाहून सेक्स पोझिशन करताना गळफास लागला; तरुणाचा जागीच मृत्यू!

नागपूर | नागपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या प्रकारच्या पोझिशनमध्ये शारारिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ही घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजवर घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेला तरुण हा 27 वर्षीय असून तो इंजिनिअर आहे, या तरुणाचे गेल्या काही दिवसांपासून 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते.

शुक्रवारी दोघांनीही फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही दहेगाव परिसरातील लॉजवर गेले आणि त्यांनी एक खोली बुक केली होती. यावेळी वेगवेगळ्या पोजिशनमध्ये शाररिक संबंध प्रस्तावित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर तरुणीने त्याचे हात-पाय दोरीने बांधले. या पोजिशनमध्ये सेक्स झाल्यानंतर तरुणी बाथरूममध्ये गेली, यावेळी तरुण खुर्चीसह खाली कोसळला. ज्यामुळे फास लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घाबरलेल्या तरुणीने लॉज व्यवस्थापकांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“सरकारी ट्विटर हॅंडलवर सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का?”

“भाजपचे सत्ताधिकारी पदाधिकारी तेव्हा झोपले होते का?”

आयुक्तांनी उचलला पोलिसांना फिट ठेवण्याचा विडा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट ‘या’ दिवसापर्यंत बंद राहणार- झुकरबर्ग

CMOकडून पुन्हा औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख करत ट्विट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या