बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उष्णतेचा वाढता पारा पाहून हवामान खात्यानं दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई | उन्हाळा सुरु झाला असून उन्हाचा तडाखाही तीव्र झाल्याचं पहायला मिळत आहे. आता उन्हामुळे शरिराची लाही लाही होत आहे. उष्णतेचा वाढता पारा पाहून हवामान खात्यानं उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या भागात 37 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर उष्णतेची लाट येऊ शकते, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.

उत्तरेकडून दक्षिणेकडे दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेनं मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने भर घातली आहेत. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले असून आरोग्य सांभाळा असं आवाहन करण्यात आल आहे.

दरम्यान, नागपूर, वर्धा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. कालही विदर्भातल्या अनेक शहरांचा पारा 40 अंशांपार गेला होता. इकडे कोकणात ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट असली तरी कोकणातलं तापमान स्थिर आहे.. या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी आहे

थोडक्यात बातम्या – 

“इतकं क्रूर पद्धतीचं, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हतं”

Shocking: स्वप्नात दिसलं असं काही की दुसऱ्याच दिवशी तीनं केलं बाॅयफ्रेंडसोबत ब्रेकअप

Corona Update: कोरोनाबाबत WHOनं दिला गंभीर इशारा, म्हणाले…

31 मार्चच्या आत पूर्ण करा ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा फटका

मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More