बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘छमिया नाच रे’, सेहवागची विराट कोहलीवर खालच्या भाषेत टीका

मुंबई | भारत आणि इंग्लंड य़ांच्यातील एजबॅस्टन पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात जोरदार वादानेच झाली. इंग्लंडचा जाॅनी बेअरस्टो आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात वाद झाला. बेअरस्टोने स्वत:वर नियंत्रण ठेवत शतक पुर्ण केले. बेअरस्टोच्या शतकानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सेहवागने ट्विट करत कोहलीवर टीका करत आपले मत मांडले.

सेहवाग म्हणाला, कोहलीच्या स्लेजिंगपूर्वी जाॅनी बेअरस्टो 21 च्या स्ट्राइक रेटने खेळत होता आणि नंतर तो 150 च्या स्ट्राइक रेटने खेळू लागला. पुजारासारखा खेळत होता पण कोहलीने विनाकारण स्लेजिंग करुन बेअरस्टोला पंत बनविले.

पाचव्या कसोटीचा तिसऱ्या दिवशी रविवारी समालोचन करताना विरेंद्र सेहवागचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये सेहवाग मैदानावर क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीच्या डान्सवर आक्षेपार्ह टिप्पणी करताना ऐकू येत आहे. मोहम्मद कैफ आणि विरेंद्र सेहवाग ऑन एअर होते. भारताला विकेट मिळाल्यावर कोहली नाच करत होता तसेच चाहत्यांचे मनोरंजन करत होता.

यावेळी काॅमेंट्री करणाऱ्या सेहवागने सोशल मिडीयावर चाहत्यांना नाराज करणारी एक काॅमेंट टाकली. यानंतर चाहत्यांनी सेहवागला त्याच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल माफी मागायला सांगितले. तसेच सेहवागला काॅमेंट्री टीममधुन वगळावे अशी मागणी केली जात आहे.

 

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी ! बहुमत चाचणीपूर्वी शिवसेनेला आणखी एक झटका

‘घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर…’, शिवसेनेचा घणाघात

मोठी बातमी! शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेच

शरद पवारांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे पुसतायेत”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More