मुंबई | आयपीएलचं (IPL 2022) यंदाचं सिझन आता अंतिम टप्प्यात आलं आहे. गुरूवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरूद्ध मुंबई इंडियन्स (MI) सामना रंगलेला पाहायला मिळाला. मुंबई विरूद्ध चेन्नई सामन्यादरम्यान मोठा वाद निर्माण झाला.
चेन्नई विरूद्ध मुंबई सामन्यात डिआरएस (DRS) शिल्लक असूनही चेन्नईला त्याचा वापर करता आला नाही. मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियस सॅम्सचा चेंडू चेन्नईचा फलंदाज डेव्हॉन कॉनवेच्या पॅडला लागला. अंपायरने आऊट दिल्यानंतर चेन्नईकडे डिआरएस शिल्लक असूनही पॉवर कटमुळे त्याचा वापर करता आला नाही. परिणामी डेव्हॉन कॉनला शून्यावर परतावं लागलं
या घटनेवरून भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) बीसीसीआयला (BCCI) फटकारलं आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने डिआरएसचा वापर होत नाही हे मोठं आश्चर्य आहे. आयपीएसारख्या एवढ्या मोठ्या T-20 लीगमध्ये जनरेटरचा वापर केला जाऊच शकतो, असं म्हणत सेहवागने बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, जनरेटरवरून सॉफ्टवेअर चालवता येतं आणि डिआरएस वापरला जातो. मग जनरेटरचा वापर फक्त लाईटसाठी केला जातो आणि ब्रॉडकास्टिंगसाठी नाही? असा सवाल सेहवागने बीसीसीआयला विचारला आहे. तर सामना असेल तेव्हा डिआरएस वापरावा नाहीतर संपूर्ण सामन्यात डिआरएस नाही असा नियम करावा, असंही सेहवाग ‘क्रिकबज’शी बोलताना म्हणाला.
थोडक्यात बातम्या-
किरीट सोमय्यांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
“…केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये”
“उद्धव ठाकरेंच्या सभेला मैदान कमी पडेल, एवढी गर्दी होईल”
राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला म्हणणाऱ्या पटोलेंना अजित पवारांचं खोचक प्रत्युत्तर, म्हणाले…
“शरद पवार मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी आतापर्यंत पाचवेळा माफी मागितली असती”
Comments are closed.