Top News खेळ

मॅच फिक्सिंगच्या बंदीनंतर ‘या’ भारतीय खेळाडूची तब्बल 7 वर्षांनंतर संघात निवड!

नवी दिल्ली | आयपीएलमधील फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर भारतीय गोलंदाज श्रीसंतची पुन्हा एकदा क्रिकेट टीममध्ये निवड झालीये. तब्बल 7 वर्षांच्या कालावधीनंतर श्रीसंत मैदानात खेळण्यासाठी उतरणार आहे.

पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या सैयद मुश्ताक अली टी-20 सिरीजसाठी केरळच्या टीममध्ये श्रीसंतची निवड करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीसंतवर 7 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

केरळच्या संघात निवड झाल्यानंतर श्रीसंतने सोशल मिडीयावरून एक भावनिक मेसेज देखील शेअर केलाय. “खचलेल्या माणसाने पुन्हा स्वत:ला उभं करण्याइतकं दुसरं मजबूत कोणीच असू शकत नाही. तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी तसंट प्रेमासाठी आभारी आहे.”, असं श्रीसंत म्हणालाय.

बीसीसीआयकडून श्रीसंतवर 7 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मात्र आता 10 जानेवारीपासून मुंबईत सुरू होणाऱ्या मुश्ताक अली ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी त्याची निवड झालीये.

थोडक्यात बातम्या- 

तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला, तर पुढील पगार शेतकऱ्यांना- नवनीत राणा

“छत्रपतींचा महाराष्ट्र फक्त भाषणात नको कृतीत दाखवा, महिला सुरक्षा फक्त घोषणेपुरती”

बनावट कागदपत्र, आधार कार्ड, बनवत योगींच्या राज्यात पाकिस्तानी महिला झाली सरपंच

“गौरी तू ज्यामुळे हा निर्णय घेतला त्यांना नक्की शिक्षा मिळणार; कुणी रक्ताचं असलं तरी”

“काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस वाळवी सारखं पोखरतोय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या