मुंबईत पुन्हा कसाब घुसणार नाही याची काळजी घ्या- शिवसेना

मुंबई | जीएसटीला शिवसेनेनं पाठिंबा दिला असला तरी आता याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलंय.

जीएसटी लागू झाल्याने मुंबईचे जकात नाके ओस पडले असून मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जीएसटी लागू झाल्याच्या आनंदात मिठाई भरवणाऱ्यांनो मुंबईच्या सुरक्षेची काळजी घ्या, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

तसंच जल्लोष सुरु असताना मुंबईत एखादा कसाब राजरोस घुसू नये, यासाठी शिवसेना सरकारला सावध करत आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडलीय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या