शेतकऱ्यांचा शिरच्छेद करणंच बाकी राहिलंय- शिवसेना

मुंबई | समृद्धी महामार्गावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा भाजप सरकारला लक्ष्य केलंय. समृद्धी महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’चा दर्जा मिळाल्यानं सरकारी यंत्रणेच्या अंगात बाहुबली संचारलाय, असं आजच्या सामनामध्ये म्हटलंय.

 तसेच हे बाहुबली अरेरावीनं शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेत आहेत. आता फक्त शेतकऱ्यांचा शिरच्छेद करण्याचं बाकी ठेवलंय, असं सामनात म्हटलंय. त्यामुळे समृद्धी महामार्गावरुन सेना-भाजपमध्ये संघर्ष पेटताना दिसतोय.