मुंबई | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वाद पेटला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी केल्याल्या टीकेला शिवसेनेच्या महिला आघाडीने सडेतोड उत्तर दिले आहे.
अमृता फडणवीस या काही भाजपच्या प्रवक्त्या नाहीत. जर त्या भाजपच्या नेत्या किंवा नगरसेवक सुद्धा असत्या तर आम्ही ऐकलं असतं. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही, अशा शब्दात विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
जर काही बालायचे असेलच तर आमच्या महिला आघाडी समोर येऊन बोलून दाखवावे, असं जाहीर आव्हानही विशाखा राऊत यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरेंकडून मेट्रो कारशेडच्या नवीन जागेची पाहणी; म्हणाले…
कोणाच्या पाठीत कोणाचा खंजीर?; बाळासाहेब विखेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप
राज्यपालांच्या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का?, बाळासाहेब थोरातांचा सवाल
पहिल्या घरातील गोष्टी निस्तरा; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात