मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना आवाहन करत शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी ईडी, सीबीआय यांच्यासह किरीट सोमय्यांना सुद्धा जम्मू-काश्मिरला पाठवा, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
ईडी, सीबीआय, एनसीबी आणि अनेक तपास यंत्रणांचा आमच्या विरुद्ध वापर केला जातो. याच यंत्रणांसह किरीट सोमय्याांना देखील जम्मू-काश्मिरला पाठवा, हे लोक खूप पाॅवरफुल आहेत, दहशतवादी त्यांना घाबरुन पळून जातील, असं म्हणत संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.
किरीट सोमय्यांना आम्ही दहशतवाद्यांचे कागदपत्रे देऊ, त्यांनी काश्मिरला जावं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अनेक मुद्दांवर भाष्य केलं आहे. तसेच विरोधकांवर देखील जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या, नरेंद्र मोदी तसेच ईडी आणि सीबीआयला देखील धारेवर धरलं आहे .
दरम्यान, जम्मू- काश्मिरमध्ये पुन्हा दहशतवाद निर्माण झाला आहे. तेथील 370 कलम हटवून देखील काही सुधारणा होत नाही. त्यानंतर परिस्थिती हाता बाहेर गेली, त्यावेळी सरकार काय करत होतं, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! दिवाळीनंतर ठाकरे सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता
अन् कुत्र्यानेही धरला ठेका, कुत्र्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही- चंद्रकांत पाटील
पुण्यातील उपायुक्तांचं भांडं फुटलं, घरात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं!
“काश्मीर बिहारींना सोपवा, 15 दिवसांत सुधारुन दाखवू”
Comments are closed.