“संजय राऊत यांना लवकर घोड्यावर बसवून तुरूंगात पाठवा”
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबागमधील संपत्ती ईडीने जप्त केली आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. त्यातच आता भाजप (BJP) नेते नितेश राणे(Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्याअर्थी ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली म्हणजेच गुन्हा सिद्ध झालेला आहे. भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे. हा भ्रष्टाचार संजय राऊत नावाच्या व्यक्तीने केला आहे. त्यामुळे संजय राऊतांना बाहेर ठेवून उपयोग नाही. त्यांना लवकरच अनिल देशमुख(Anil Deshmukh)आणि नवाब मलिक(Nawab Malik) यांच्या बाजूला शिवभोजन थाळी खाण्यासाठी पाठवलं पाहिजे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
ईडीने संपत्ती जप्त केल्याने याचा सरळसरळ अर्थ होतो की, संजय राऊतांनी भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांना लवकर घोड्यावर बसवून तुरूंगात पाठवलं पाहिजे, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊतांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने कोणतेही कारवाई केली तरी घाबरणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं.
दरम्यान, मला पुर्ण कल्पना होती की, ईडी आणि सीबीआय पाठीमागे लागणार आहे. मी व्यंकय्या नायडूंना पत्रही लिहीलं होतं. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव येत आहे, असे आरोप संजय राऊतांनी केले आहेत. त्यातच संजय राऊतांना तुरूंगात पाठवण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर मोठी कारवाई, तीन महिने कारावासाची शिक्षा
10 वी 12 वी च्या निकालाविषयी महत्त्वाची माहिती आली समोर
“किरीट सोमय्या चु*** आहे, तो आम्हाला अक्कल शिकवणार का?”
Sanjay Raut: “बंदुक लावा, हत्या करा, मी तुमच्या बापाला घाबरत नाही”
“चोरी पकडली जाऊ नये, म्हणून संजय राऊत बॅकफूटवर गेलेत”
Comments are closed.