बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वयाच्या 25 व्या वर्षी खासदार झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दामोदर शिंगडा यांचं निधन!

मुंबई | काँग्रेसचे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्यावर वसईच्या कार्डिनल ग्रेसस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. वसईच्या कार्डिनल ग्रेसस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

इंदिरा गांधी त्यांना लिटल खासदार म्हणायच्या. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दामोदर शिंगडा वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

शिंगडा गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांपैकी एक होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दामोदर शिंगडा यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा कैवारी हरपला आहे, अशा भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या.

अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातून आलेल्या दामोदर शिंगडा यांनी आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते सक्रिय राजकरणात आले. लोकांशी जुळलेली नाळ तसेच दांडग्या जनसंपर्कामुळे शिंगडा आदिवासी समाजात ते अत्यंत लोकप्रिय झाले, असं नाना पटोले म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

नितेश राणेंची महाविकास आघाडीच्या आमदारांना खुली ऑफर, म्हणाले ‘येणारा धोका समजा’

संजय राऊत म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना- देवेंद्र फडणवीस

‘क्रूर महिला पुन्हा सत्तेत आली’; ‘या’ भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ममता बॅनर्जींचं अभिनंदन, म्हणाले…

“बंगालमध्ये पराभव झाला म्हणजे मोदी आणि शहांची लोकप्रियता कमी झाली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More