बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अभिनेता अरबाज खानकडूनही परमबीर सिंह यांनी पैसे घेतले”

मुंबई | मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना 100 कोटी रूपये द्यायला लावले असल्याचं परमबीर सिंह यांनी म्हटलं होतं. देशमुखांची सीबीआय चौकशी चालू आहे. मात्र अशातच मुंबईतील व्यावसायिक सोनू जलालने परमबर सिंह यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.

परमबीर सिंह, राज कुमार कोथमिरे, प्रदीप शर्मा आणि इतर यांनी मला रवी पुजारीचा साथीदार दाखवून माझाकडून खंडणी उकळली, असा आरोप सोनू जलानने केला आहे. तो पत्रकार परिषदेत बोलत होता.

मी आतापर्यंत घाबरत होतो मात्र मी मनाची समजूत काढून घरातल्यांना विश्वासात घेऊन मी आता पुढे आलो आहे, असं सोनू जलान म्हणाला. मी 13 महिने जेलमध्ये होतो, ज्या दिवशी मला अटक झाली, त्यावेळी मला परमबीर सिंह यांच्या कँबिनमध्ये नेलं. तेथे मला प्रदीप शर्माला सहकार्य करण्यास सांगितलं असल्याचं सोनूने सांगितलं. यावेळी बोलताना, अभिनेता अरबाज खानकडूनही परमबीर सिंह यांनी पैसे घेतले असल्याचंही सोनू जलान म्हणाला.

दरम्यान, कॅबिनमध्ये कोथमिरे आणि दोन शिपाई होते. मी आतमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला मला मारलं. त्यानंतर माझ्याकडे 10 कोटींची मागणी केली, असा आरोप सोनू जलानने केला. परमबीर हे काहीही करू शकतात. कोणी पैसे दिले? कसे दिले? हे सांगितलं तर त्या व्यक्ती गायब होतील. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. गुन्हा नोंदवला की मी सर्व पुरावे देईन, असं सोनू जलान म्हणाला. यावर परमबीर सिंह काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्याा- 

“मोदींनी देशाला चीनचा कचरा, चिंता आणि चिता हे तीन चि दिले”

“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं नशीब”

कुठल्याही हमीशिवाय PPF खात्यावर मिळणार कर्ज; फक्त ‘या’ अटी करा पूर्ण

‘केंद्राने लसीचा साठा पाठवला पण…’; भाजपच्या या बड्या नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

…अशी कामगिरी करणारा भारत बनला जगातील पहिला देश!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More