Top News आरोग्य कोरोना

सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावालांनी पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी!

पुणे | कोरोना व्हायरसच्या लसीसाठी प्रत्येकजण प्रतिक्षेत आहे. या दरम्यान सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक मोठी मागणी केलीये.

कोरोना लसीबाबतच्या साईड इफेक्टमुळे लस बनवणाऱ्या कंपन्यांवर खटले दाखल होऊ शकतात. यापासून संरक्षण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कायदा बनवाव अशी मागणी, अदर पुनावाला यांनी केलीये.

पुनावाला यांच्या सांगण्यानुसार, “कोरोनाची लस दिल्यानंतर त्याचा विपरित किंवा गंभीर परिणाम झाल्यास त्यासाठी लस निर्मिती कंपनीला जबाबदार धरण्यात येऊ नये. लस निर्मिती कंपन्यांवर कोणत्याही प्रकारचे कायदेशीर गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी सरकारने असा कायदा करावा.”

लसीसंदर्भात कथित दुष्परिणामांबाबत जर असं खटले दाखल होऊ लागले, तर लोकांमध्ये लसीबाबत भिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचं देखील पुनावाला यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष”

रतन टाटा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार; म्हणाले…

धक्कादायक! सावत्र आईने चिमुकल्याला गरम तव्यावर उभं करत दिले चटके

ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत- सुवेंदू अधिकारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या