बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सत्र न्यायलयाचा राणा दांपत्याला दणका; अटींचं उल्लंघन अंगलट येणार?

मुंबई | ‘मातोश्री’ बाहेरील हनुमान चालिसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना सशर्त जामीन मंजूर झाला असून त्यांना पाच अटींचं पालन करणं बंधनकारक होतं. मात्र, जामीनासाठी असलेल्या अटींचा राणा दांपत्यांकडून भंग झाला असून त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने सत्र न्यायालयात करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या अर्जावर आज सुनावणी पार पडली. राज्य सरकारच्या या अर्जावर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने राणा दांपत्याला नोटीस बजावली आहे. तर यावेळी तुमचा जामीन का रद्द करू नये याचं उत्तर न्यायलयाने राणा दांपत्याकडे मागितलं आहे.

नवनीत राणा यांनी लीलावती रूग्णालयातून बाहेर येताच ठाकरे सरकारला फैलावर घेतलं. राणा दांपत्याने जामीन मिळाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचं पालन न करता ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.

दरम्यान, राणा दांपत्याच्या वक्तव्यांमुळे जामीन अटींचा भंग होत आहे, असा आरोप सरकारकडून करण्यात आला. तसेच राणा दांपत्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट काढण्याची मागणी देखील सरकारी वकीलांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

…अन् संजय राऊत आणि अजित पवार आपापसातच भिडले

काय सांगता? सोनाक्षी सिन्हाने गुपचूप साखरपुडा उरकला? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

‘बाप’रे! 70 व्या वर्षी पुतिन पुन्हा बाप होणार; युद्धजन्य परिस्थितीत गर्लफ्रेंड प्रेग्नेंट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More