पुणे महाराष्ट्र

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!

Loading...

पुणे| पिंपरी चिंचवड भागात पुन्हा एकदा स्पा सेंटर मध्ये चालू असलेला देहविक्रीचा व्यवसाय उघडकीस आला आहे. पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उद्धस्त केलल आहे. दरम्यान संबंधित 6 तरूणींची सुटका करण्यात आली आहे.

चिंचवड शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या स्पाईन सीटी मॉलमधील दुकान नंबर 3 आणि 4 मध्ये ‘सिटी स्पा मसाज सेंटर’ या नावाने सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिपाली मरळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या मसाज सेंटरवर छापा टाकला.

Loading...

सेक्स रॅकेटमध्ये अटक करण्यात आलेल्या चौघांवरही मसाज सेंटरमधील तरुणींना वैश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच तरुणींनी देहविक्री केल्यानंतर मिळणारी रक्कम चारही आरोपी हे स्वतःची उपजीविका भागविण्यासाठी वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, स्पा सेंटर चालवणाऱ्या आणि तिथे आढळून आलेल्या राजेश कानुरे,शिवा कोळपे,रितेश घाटकर आणि विक्रम पलांडे या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

Loading...
Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या