बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ; भाजपचा बडा नेता अडचणीत!

गांधीनगर | सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका सेक्स व्हिडीओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ माजली आहे. हा व्हिडीओ भाजपच्या बड्या नेत्याचा असल्याचा आरोप केला जात आहे. या व्हिडीओमुळे गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

आम आदमी पार्टीच्या नेत्याने 15 ऑगस्टला संपूर्ण व्हिडीओ सर्वांसमोर आणणार असल्याचा दावा केला आहे. आपचे नेते मधाबाई पटेल यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील व्यक्ती भाजप नेता असल्याचा दावा मधाबाई पटेल यांनी केला आहे.

फोटोमधील व्यक्ती भाजपचे खासदार परबत पटेल असल्याचं मधाबाई पटेल म्हणालेत. मात्र हे कटकारस्थान असल्याचं म्हणत परबत पटेल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांच्या मुलाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. माझे वडिल निर्दोष असल्याचं परबत पटेल यांच्या मुलाने म्हटलं आहे.

दरम्यान, मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये कधीही कुठलंही वाईट काम केलेलं नाही. कदाचित माझे फोटो एडिट करून मॉर्फ करण्यात आले असावेत, असं परबत पटेल यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मायग्रेनने ग्रस्त असलेल्या लोकांनी ‘हे’ खाऊ नये!

पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे जमा होणार

“गंगा नदीच्या पाण्यात कोरोना व्हायरस टीकू शकत नाही”

हे वेदनादायक आहे, माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत हे कधी पाहिलं नव्हतं- शरद पवार

रानडे इंस्टिट्युटचा वाद शिक्षणमंत्र्यांच्या दरबारी; रानडे इंस्टिट्युटला शनिवारी भेट देणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More