रक्ताने माखलेले सॅनटरी पॅड घेऊन तुम्ही मित्रांकडे जाल का?; स्मृती इराणींचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्या मुंबईतील यंग थिंकर परिषदेत बोलत होत्या

रक्ताने माखलेले सॅनटरी पॅड घेऊन तुम्ही मित्रांकडे जाल का? तर तुम्ही नाही जाणार. मग अशा परिस्थितीत देवाच्या मंदिरात जाणं हे आदरपूर्ण आहे का?,  असा विचारच तुम्ही कसा करू शकता? असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. 

मी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलू शकत नाही. कारण मी केंद्रात मंत्री आहे, असंही त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तरीही काही संघटनांचा याला विरोध आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…नाहीतर तूला खल्लास करेन; उदयनराजेंनी दारू दुकानदाराला धमकी दिल्याचा आरोप!

-उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

-#MeToo | अजून बरंच काही चव्हाट्यावर यायचं आहे- राधिका आपटे

-…तेव्हाच 50 वर्ष राजकारण करता येईल; शरद पवारांचा सल्ला

-2019 मध्ये पंतप्रधान मोदींची खुर्ची जाणार- शरद पवार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या