बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आफ्रिदीच्या आत्मचरित्रात गंभीरचा ‘माजोरडा’ म्हणून उल्लेख; गौतमचंही सडेतोड प्रत्युत्तर

नवी दिल्ली | पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा त्याच्या आक्रमक स्वभावासाठी नेहमी चर्चेत असतो. मात्र सध्या आफ्रिदी आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे.

आफ्रिदीने आपल्या Game Changer या आत्मचरित्रात भारताताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा माजोरडा असा उल्लेख केला आहे. गौतम गंभीर हा सामान्य वकुबाचा क्रिकेटर असला तरी तो स्वत:ला उगाचच महान समजतो. त्यामुळे तो कायम अशा तोऱ्यात मिरवतो जसा की त्याच्यात डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बाँड यांचा मिलाफच झालेला आहे, असं आफ्रिदीने म्हटलंय.

आफ्रिदीने केलेल्या टीकेला गौतम गंभीरनेही प्रत्युत्तर दिलं आहे. स्वतःचं वय माहिती नसलेला माणूस आज माझ्या विक्रमांबद्दल बोलतोय. खोटारड्या आणि संधीसाधू व्यक्तींसाठी मी असाच माजोरडा आहे अशा आशयाचं ट्विट गंभीरने केलं आहे.

काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका पुन्हा सुरु होण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं.

 

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यातील मजुरांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

कोरोनाशी लढा देणाऱ्यांसाठी 45 खोल्यांचं हॉटेल खुलं; शिवसेना नगरसेवकाचा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

कराडमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त; रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात निरोप

सोलापुरात गारपीटीसह जोरदार पाऊस, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान

रंगोलीच्या समर्थनार्थ कंगना मैदानात; म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More