आफ्रिदी म्हणे ‘तो मी नाही’; भारतीय प्रसार माध्यमांवर केला आरोप

मुंबई | काश्मीर प्रश्नाबाबत पाकिस्तानला घरचा आहेर देणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीने आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे. यासाठी आफ्रिदीने भारतीय प्रसार माध्यमांनावर खापर फोडलं आहे. 

भारतीय प्रसार माध्यमांनी माझ्या व्हीडिओची क्लिप तोडूनमोडून दाखवली आहे. मला माझ्या देशाचा आणि कश्मिरींच्या लढ्याचा सार्थ अभिमान आहे. किमान माणुसकीच्या नात्याने त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, असे आफ्रिदीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पाकिस्तान स्वतःच्या देशातील लोकांना सांभाळू शकत नाही. मग काश्मीर काय सांभाळणार, असं वक्तव्य शाहीद आफ्रिदीने केलं होतं.

दरम्यान, या वक्तव्यावरून भारतातून त्याची वाहवाही झाली होती. तर पाकिस्तानमधून त्यावर खूप टीका करण्यात आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-फडणवीस सरकार आमचा छळ करत आहे, मेलो तरी मागे हटणार नाही- मराठा आंदोलक

-अशोक चव्हाण 2019ला लोकसभा लढणार नाही?

-भाजप आमदाराला गावकऱ्यांनी शिव्या घालत गावातून हाकललं!

-तुमच्या वक्तव्यांमुळे आम्ही मार खातो, डायलॉगबाजी बंद करा, संजय निरुपमांना फटकारलं

-मनेका गांधींना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही- सुधीर मुनगंटीवार