आगोदर आपल्या लोकांना सांभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी

नवी दिल्ली | आपल्याच लोकांना सांभाळताना पाकिस्तानच्या नाकीनऊ येतात, तिथं काश्मीर काय सांभाळणार, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने केलं आहे. तो एका पत्रकार परिषदेत बोलत होता.

आफ्रिदी एवढं बोलून थांबला नाहीतर, काश्मीर पाकिस्तानला देऊ नका आणि भारतालाही देऊ नका. त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या, अशी मागणी आफ्रिदीने केली आहे.

त्यामुळे काश्मिरमधील माणुसकी तरी जिवंत राहील. जी माणसं मरत आहेत, ते मरणार नाहीत, असं सुचक वक्तव्य त्यानं केलें आहे. 

दरम्यान, आफ्रिदीचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आफ्रिदीच्या या वक्तव्यामुळे मात्र पाकिस्तानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे

-भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

-हिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा!

-दारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार!

-प्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली!