बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शहनाजने सिद्धार्थला दिला ट्रिब्यूट; ‘या’ खास गाण्यातून वाहिली श्रद्धांजली

मुंबई | 2 सप्टेंबर रोजी बिग बाॅस 13 फेम सिद्धार्थ शुक्लाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. यानंतर त्याची खास मैत्रिण अभिनेत्री शहनाजला मोठा धक्का बसला होता. शहनाज आणि सिद्धार्थची जोडी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. त्यांच्या जोडीला ‘सिडनाज’ असं नाव देण्यात आलं होतं. मात्र त्याच्या मृत्यूने ही जोडी लोकांना पाहिला भेटणार नाही. यानंतर आता शहनाजने सिद्धार्थला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.

शहनाजने तिच्या आवाजात सिद्धार्थसाठी गाणं गायलं आहे. या गाण्याचे बोल ‘तु है यही’ असं आहेत. हे बोल राज रणजोध यांनी लिहिले आहेत. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये शहनाजच्या अनेक भावना झळकतात. तसेच या व्हिडीओमध्ये शहनाज आणि सिद्धार्थच्या आठवणींना उजाला देण्यात आला आहे.

बिग बाॅसच्या घरातील अनेक क्षण या व्हिडीओमध्ये दिसून येतात. सिडनाजचे चाहते आतुरतेने या गाण्याची वाट पाहत होते. अशातच हे गाणं 29 ऑक्टोबर रोजी रिलीज झालं आहे.

दरम्यान, शहनाज आणि सिद्धार्थची जोडी लोकांच्या नेहमीच पसंतीस होती. या जोडीला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी सगळेच नेहमी उत्सुक असायचे. तसेच ही जोडी नेहमी सर्वांना खळखळून हसवायची. मात्र सिद्धार्थच्या जाण्याने आता ही जोडी पुन्हा सर्वांच्या नजरेआड झाली आहे.

पाहा गाणं-

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार यांचं निधन

“राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्यामुळे….”

‘राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर प्रहार

अंड वापरा आणि केसांचं गळणं थांबवा, कसं ते जाणून घ्या

“आमच्याकडे अहो, मुन्नु, टुन्नु अशी हाक मारतात, मी पहिल्यांदाच ऐकलं की लाडाने दाऊदही म्हणतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More