बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाकिबची दमदार कामगिरी! मलिंगाला मागे टाकत केला ‘हा’ नवा विक्रम

दुबई | बहूप्रतिक्षीत टी ट्वेंटी विश्वचषकाची सुरूवात झाली आहे. क्रिकेटच्या या रोमांचकारी प्रकारात फटकेबाजी पहायला मिळते. या विश्वचषकात अनेक विक्रम होतात आणि अनेक विक्रम मोडतात याची सुद्धा सुरूवात झाली आहे. विश्वचषकाच्या सुरूवातीलाच बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसननं एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

बांग्लादेश आणि स्काॅटलंड यांच्यात आज सुरूवातीचा सामना झाला आहे. या सामन्यात शाकिबनं आपल्या अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं आहे. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी प्रकारात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम शाकिबनं आता आपल्या नावावर केला आहे. लसिथ मलिंगाच्या 107 बळींचा विक्रम मोडण्यात शाकिबनं यश मिळवलं आहे.

स्काॅटलंडच्या डावात 11 व्या षटकात शाकिबनं 2 गडी बाद करत या विक्रमाला गवसणी घातली आहे. शाकिब आता जगातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. 89 सामन्यात शाकिबनं हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एका डावात 20 धावांमध्ये 5 बळी ही शाकिबची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

दरम्यान, शाकिब क्रिकेट जगातील सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून गणला जातो. प्रमुख संघाविरूद्धच्या सामन्यापूर्वी शाकिबनं बळी घेतल्यानं बांग्लादेश संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.

थोडक्यात बातम्या 

जळगावात रंगणार ‘खडसे विरूद्ध खडसे’ सामना; भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता

‘हाफ चड्डी बदलली, डोळे मारण्याचे दिवस गेले’; युवकांना बोलताना उदयनराजेंनी मारला डोळा; पाहा व्हिडीओ

”ती’ गोष्ट माझ्या कायम स्मरणात राहील’; शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

दिलासादायक! तब्बल 18 महिन्यानंतर मुंबईत एकही कोरोना मृत्यू नाही; पाहा आजची आकडेवारी

केरळमध्ये पावसाचा हाहाकार! भूस्खलनात शेकडो नागरिक दबल्याची भीती तर 26 जणांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More