बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिल्ली, युपीपेक्षा महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना …”

मुंबई | महाराष्ट्र हादरवणाऱ्या साकीनाका घटनेनंतर पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 नराधमांनी बलात्कार केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

डोंबिवलीतील सामुहिक बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे. महाराष्ट्रात डोंबिवली येथे घडलेल्या घटनेवरून शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. दिल्ली यूपीपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी हे सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अजुन काय घडणं अपेक्षित आहे, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी 22 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. अत्याचाराचा व्हिडीओ पीडित मुलीच्या प्रियकराने शुट केला आहे.

दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे आरोपींवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. त्यासोबतच  राज्यात शक्ती कायद्याची लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिंकाकडून होत आहे. ‘शरियत’ सारखा कायदा आणा मगच बलात्कार थांबतील, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! पाकड्यांनी भारतात पाठवलेत अफगाण दहशतवादी???; ‘या’ भागांवर हल्ला होण्याची शक्यता!

“अनिल देशमुख ईडीला येडं समजतात, राज्याचा ‘झू’ करून टाकलाय”

पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळे नंतर पुढचा जन्म रस्ते काॅन्ट्रॅक्टरचा मिळू दे- हेमंत ढोमे

ठेच लागता पायी, वेदना होई तिच्या ह्रदयी! लेकराला मृत्यूच्या दारातून आणलं परत, पाहा व्हिडीओ

”अनंत गीतेंची जी अवस्था आहे तिच शिवसैनिकांची आहे, त्यांना कोणी विचारत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More